Friday 11 July 2014

पीएमसींची फी किती? ती कुणी? का द्यायची??

पीएमसींची फी किती? ती कुणी? का द्यायची??
       सभासदांना नेहमी भेडसावणाऱ्या पीएमसींच्या फी बाबत …. ती फी किती? ती कुणी  व का द्यायची हे समजावून घेऊया. सोसायटीने बहुसंख्य सभासदांच्या सहमतीने नियुक्ती केलेले पीएमसी, सोसायटीच्या प्लॉट वर FSI / TDR  यांच्या सहाय्याने किती जास्त बांधकाम होईल हे लक्षात घेऊन सभासदांना जास्तीत जास्त कोणकोणते फायदे मिळवायला हवेत हे निश्चित करतात. म्हणजेच विकासकाकडून त्यांना सांगितल्या/दिल्या जाणाऱ्या अव्यव्हार्य (फार कमी किवा न दिल्या जाणाऱ्या फार जास्त) नुक्सानापासून सभासद आणि त्याचे कुटुंबीय निश्चितपणे वाचतात. याच कारणास्तव शाशनाने त्यांची सुरुवातीलाच नियुक्ती अनिर्वाय केली आहे.
     प्रकल्प फायद्यांची योग्य विभागणी : पीएमसी व्यवहार्य अहवालाद्वारे (Feasibility Report) सभासदांना मिळू शकणारी किमान वाढीवजागा, कोपर्स फंड, भाडे (+वाढ), ब्रोकरेज सामान, वाहतूक, बांधकामासाठी जादा एफ. एस. आय. टी. डी. आर. खर्च, सर्व प्रशाशकीय खर्च, कन्वेयन्स, कायदेशीर प्रक्रिया, करारनामे, लायझनिंग खर्च, architecture कामे सर्व तज्ञांचे मानधन, मुनिसिपाल नकाशे, परवानग्या, नवीन इमारतीचे संपूर्ण बांधकाम टिकाऊ दर्जेदार बांधकाम खर्च , रेन -water  हार्वेस्टिंग , पेस्ट कंट्रोल , विकासकाची यंत्रणा , मशिनरी , विक्रीसाठी येणारा खर्च , विकासकाचा सुरुवातीचा गुंतवणूकीवरील व्याज आणि विक्रीसाठी त्याला मिळणारी जागा.  म्हणजेच विकासकाचा व्यवहार्य आर्थिक फायदा या सर्वाचे सुयोग्य नियोजन करतात.

     सर्व पीएमसी असोसिएटसमुळे होणारे इतर फायदे : जसे बांधकामतज्ञातर्फे कामगारांना योग्य प्रशिक्षण देवून दर्जेदार टिकावू काम करून घेतले जाते, आर्कीटेक्ट व इंजिनियर्स इमारतीचा प्लान सभासदासाठी फायादेशीर ठरेल हे पाहतात , सभासदाना पूर्ण सुरक्षित करण्यासाठी कौशल्य , करारपत्र बनवातानाचे वकील पणाला लावतात , थोडक्यात , सर्व पीएमसी तज्ञामुळे योग्य वेळात उत्कृष्ट दर्जाचे टिकवू बांधकाम आणि म्हणूनच प्रकल्प यशस्वीरीत्या  पूर्ण व्हायला मदत बहुमुल्य मदत होते .
          प्रकल्पाचा कालावधी ३६ महिने गृहीत धरला तर या पूर्ण कालावधीत प्राकल्पातील एंक फार महत्वाचा घटक असलेल्या सर्व पिएमसी तज्ञांना (बांधकाम तज्ञ , आर्कीटेक्ट structure engineer, वकील सुपरवायझर ) सर्वांना मिळून फायद्यातील हिस्सा म्हणून महिना ६०० ते ७०० रुपये एवढा मोबदला एका सद्निकामागे मिळणार असेल तर तो मेहनताना /फी अयोग्य वा जास्त आहे का ?

         प्रकल्पाच्या संपूर्ण किमतीचा विचार केल्यास, सर्व पीएमसी तज्ञांना मिळणारा मोबदला 
०. १५% ते ०. २% एवढाच असतो. पीएमसी साईटवर साधारण ३ वर्षे या फी पोटी मेहनत घेतात. त्या पार्श्वभूमीवर त्या प्रकल्पातील कोणतीही व कसलीही जबाबदारी न स्वीकारता, ग्राहकांसह ३-४ वेळा फक्त व्हिजीट देऊन खरेदी-विक्रीचे व्यवहार करणाऱ्या इस्टेट एजंटला मिळते २% कमिशन.  

No comments:

Post a Comment