Sunday 13 July 2014

सोसायटीच्या इमारतीचा पुर्नविकास

सोसायटीच्या इमारतीचा पुर्नविकास
       सोसायटीच्या प्लॉट वर FSI / TDR  सहाय्याने किती जास्त बांधकाम करता येईल हे नेमलेले पीएमसी लक्षात घेऊनच प्रकल्प व्यवहार अहवाल (Feasibility Report ) बनवतात. वाढीव जागा विक्रिमधुनच सभासदांना फायदे मिळणार असतात. सोसायटीच्या पीएमसीच्या मदतीने विकासाला नेमून नवीन इमारत बांधण्याचे व वाढीव जागा विक्रीचे कामे पूर्ण करून द्यायची असतात. या सर्वांमधून होणाऱ्या आर्थिक फायद्यातून निर्माण होणारे चित्र सर्वसाधारण खालीलप्रमाणे असते.

(१) पूर्वीची जागा + काही वाढीव जागा (+फ्री पार्किंग) भू-मालक सभासदांना मिळते.
(२) भावीकाळात वाढीव कर आणि इतर बाबींसाठी तरतूद स्वरुपात प्रत्येक सभासदाला आर्थिक फायद्याची (कॉपर्स फंड) पक्की तरतूद मिळते.
(३) बांधकामकाळात सभासदांना इतरत्र राहण्यासाठी भाडे.
(४) दर ११ महिन्यानंतरचे वाढीव भाडे, भाड्यापोटी द्यावी लागणारी दलाली, सामान वाहतूक वगैरे खर्च यांची तरतूद.
(५) वाढीव बांधकामासाठी विकत द्यावा लागणारा एफएसआय, टीडीआर व त्यांच्या अनुषंगाने येणारे सर्व खर्च.
(६) पुनर्विकास पूर्ण कायदेशीर होण्यासाठी करावा लागणारा सर्व प्रशासकीय, कन्वेन्यन्स, अर्किटेक्ट- कायदेशीर करार- फी वगैरे खर्च.
(७) लायझानिग - म्युनिसिपल (plan , परवानग्या वगैरे) कामांचा खर्च.
(८) बांधकामचा (पुढील काळात वाढणाऱ्या खर्चासहित) संपूर्ण खर्च.
(९) रेन water , पेस्ट कंट्रोल, फायर प्रोटेक्शन वगैरे सुविधांचा खर्च.
(१०) बांधकाम उत्कृष्ट - टिकाऊ व्हावे.
(११) शाशकीय नियमावलीनुसार (७९ अ) नेमलेल्या पीएमसीची फी.
(१२) infrastucture, मार्केटिंग वगैरे विकासाला येणारा खर्च.
(१३) विकासाचा नफा किवा त्याला विक्रीसाठी मिळणारी जागा.

       थोडक्यात वाढीव मिळणारा FSI  / TDR यांची गणिते मांडल्यावर विकता येणाऱ्या जागेमधून जो फायदा निर्माण होणारा असतो. त्यातील मोठा हिस्सा जमीनमालक म्हणून सभासदांना मिळायलाच पाहिजे. हि मेहेरबानी नव्हे हे सभासदांनी लक्षात घ्यावे.
मुख्य म्हणजे सभासदांना कोणते फायदे कशा पद्धतीने मिळायला हवेत हे विकासकांनी ठरवायचे नसून सोसायटीने नेमलेल्या पीएमसी तज्ञांनी ते व्यवहार्य फायदे ठरवायचे असतात.


लक्षात ठेवा, बहुतेक पुनर्विकास प्रकल्प रखडलेले आहेत. त्याला विकासपेक्षा जास्त कारणीभूत कोण असेल तर ते आहेत. बेकायदेशीररित्या नियुक्त झालेले अयोग्य ''पीएमसी'' ....

For More Detail Please call us :
Call             : 9223419450  
Only sms       : 7303055782
Twitter Id      : @Yashrajandasso
Email         : ypmc.in@gmail.com


No comments:

Post a Comment