Friday 5 September 2014

बहुतेक पुनर्विकास प्रकल्प रखडलेले आहेत ते का?


पीएमसी तज्ञांची निवड
                पीएमसी कंपनीची निवड फार काळजीपूर्वक केली पाहिजे. विशेष सर्वसाधारण सभेच्या अनेक दिवस आधी इच्छुक पीएमसी कंपन्यांना सर्व सभासदांसमोर त्यांचे प्रेझेंटेशन देणे सोसायटीने बंधनकारक करायलाच हवे.यामुळे त्यांना प्रकल्पासाठी सर्वोकृष्ट पीएमसीची नेमणूक करता येईल. त्यांचे खास वैशिष्ट्य कोणते ते सर्वांनी जाणून घ्यायला हवे. सर्व सभासदांच्या सहमतीने व बहुमताने सर्वात चांगल्या पीएमसी कंपनीची पहिल्या विशेष सभेत निवड व नेमणूक केली गेली पाहिजे.
                पुनर्विकास प्रकल्पासाठी योग्य पीएमसी कंपनीची निवड म्हणजे प्रकल्प यशस्वी होण्याच्या दृष्टीने पहिले यशस्वी पाउल.
                त्याच्या उलट पीएमसी म्हणून अयोग्य व्यक्ती अथवा कंपनीची निवड केली गेली तर तो प्रकल्प हमखास अडचणीमध्ये येणार. कारण अयोग्य पीएमसीची नियुक्ती झाली की सोसायटीमध्ये अयोग्य विकासक देखील निवडला जाणार. मग त्यांची अभद्र युती व्हायला कितीसा वेळ लागतो?यामुळेच अनेक प्रकल्प सभोवताली पत्रे लागून काहीही काम होता वर्षानुवर्षे बंद पडून आहेत. दुर्दैवाने, सभासदांची व त्यांच्या कुटुंबियांची मात्र ससेहोलपट होते आहे.

               
बहुतेक पुनर्विकास प्रकल्प रखडलेले आहेत त्याला
विकासकापेक्षा जास्त कारणीभूत कोण असेलतर ते आहेत बेकायदेशीररित्या नियुक्त झालेले “अयोग्य पीएमसी”…….
               
               
                म्हणूनच सर्व सभासदांच्या सहमतीने व बहुमताने सर्वात चांगल्या पीएमसींची, पहिल्या विशेष सभेत निवड झाली पाहिजे.

               
                सभासदांना बहुमताने/एकमताने आपल्याला हवा तोच विकासक निवडायचा अधिकार असतो. तोच अधिकार त्यांना “पीएमसी” निवडीसाठी पहिल्याच विशेष सर्वसाधारण सभेत दिला पाहिजे.तरच “पीएमसी” निवड कायदेशीर व योग्य ठरेल.
               
                पीएमसी कंपनीची निवड सर्व सभासदांनी करण्याऐवजी ही निवड व्यवस्थापकीय समितीचे काही सभासद आपल्या “मर्जीने” करतात. यामुळेच सर्व चुकांना व गोंधळाला सुरुवात होते. ज्याअर्थी शासनाने ती निवड पहिल्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये केली पाहिजे असे म्हटले आहे त्याअर्थी विशेष सर्वसाधारण सभेतील उपस्थित सभासदांच्या बहुमतानेच ती निवड व्हायला हवी.
                कामात पारदर्शकता रहावी म्हणून निवड झालेले पीएमसी त्यांच्या मदतीसाठी विश्वासू सभासदांची "देखरेख समिती"बनवतात. देखरेख समिती, पीएमसी कंपनी व विकासकाची पूर्ण यंत्रणा यांचे एकमेकांबरोबर सदैव ताळमेळ [Co-Ordination]असेल हे करारपत्रामध्ये नमूद करून तसे नियोजनसुद्धा करतात.
                कामाचा दर्जा, टिकावूपणा, वेळेचे व्यवस्थापन योग्यराबविलेजात आहे याबाबतचे पीएमसी तज्ञांचे अहवाल पाहून देखरेख समितीने योग्यकार्यवाहीसाठी पाउले उचलली पाहिजेत.साईटवर सोसायटीचा एक [पगारी[ सभासद देखरेखीसाठी असेल अशी रचना व व्यवस्था पीएमसीने व सोसायटीने मिळून केल्यास फार उत्तम.

                तसेच पीएमसीने इमारतीचे बांधकाम सुरु असलेल्या साईटवर दर ३ महिन्यांनी सर्व सभासदांची सभा घेवून त्यांना सुरु असलेल्या कामाच्या प्रगतीची कल्पना सातत्याने दिली पाहिजे.यामुळे दर्जा व वेळ नियोजन यावर पूर्ण अंकुश राहू शकतो.

No comments:

Post a Comment