Wednesday 20 August 2014

सभासदांच्या तक्रारी: भीती: उपाय


सभासदांच्या तक्रारी: भीती: उपाय
                अशा अनेक तक्रारी येत आहेत की, नियमावलीचे अजिबात पालन न करता काही विकासकांनी सोसायटीच्या सभासदांकडून कन्सेंट लेटर [संमतीपत्रे], एमओयु [परस्पर सामंजस्य स्मरणटाचण] यांच्यावर सह्या घेतल्या आहेत.त्यासाठी काही खर्चही केले आहेत.
                त्यानंतर आमचे लेख-पुस्तिका-परिसंवाद यामधून ज्ञान मिळाल्यामुळे नियमावलीचे पालन न केल्यास आपण बेघर होवू शकतो या जाणीवेने सभासद कायदेशीर मार्गाने आपला प्रकल्प पूर्ण करू इच्छितात. मात्र अशावेळी विकासक व त्याची माणसे सह्या केलेल्या कन्सेंट लेटर व एमओयु यांची भीती त्यांना दाखवून आता तुम्हाला परत फिरता येणार नाही अशी तंबी देत आहेत. त्यामुळे सभासद घाबरत आहेत व डोक्याला हात लावून बसत आहेत.
                त्यांनी अजिबात घाबरू नये. नियमावलीचे पालन न करता बेकायदेशीर पद्धतीने केल्या गेलेल्या कोणत्याही कन्सेंटलेटर, एमओयु, अॅग्रीमेंट [करारपत्र] यांना भारतीय कायदा मान्यता देत नाही. ती सर्व नियमबाह्य प्रक्रिया व बेकायदेशीर करारपत्रे रद्दबादल करता येवू शकतात. नंतर ती सोसायटी व सभासद कायदेशीर मार्गाने पुनर्विकासाची सर्व प्रक्रिया परत नव्याने सुरु करू शकतात.
                उदा. “अ” ने “ब” ला कन्सेंटलेटर, एमओयु, अॅग्रीमेंट “बनवून” ताजमहाल विकला तर “ब” ताजमहालचा मालक बनेल का? नाही. कारण ताजमहाल ही भारत सरकारची मालमत्ता आहे. कायद्याच्या चौकटी बाहेरील कन्सेंटलेटर, एमओयु, अॅग्रीमेंट यांना भारतीय कायदा मान्यता देत नाही.



अधिक माहितीसाठी अवश्य संपर्क साधा.

No comments:

Post a Comment