Friday 8 August 2014

पुनर्विकासाची योग्य प्रक्रिया



शाशकीय निर्देश ७९ (अ) मुळे होणारी पुनर्विकासाची योग्य प्रक्रिया 

सोसायटीच्या किमान २५ % सभासदांना सेक्रेटरीकडे पुनर्विकासाबाबत चर्चा करून निर्णय घेण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभेची मागणी लेखी स्वरुपात केली पाहिजे. सेक्रेटरीने एका महिन्यात विशेष सर्वसाधारण सभा (वि. स. स. ) बोलावली पाहिजे. या सभेचा कोरम किमान ७५% हवा. या सभेत पुनर्विकासाबाबत निर्णय घेतला गेला पाहिजे. बहुमताने पुनर्विकास करायचा ठरवल्यास सभासदांच्या सूचनांसह याच सभेमध्ये प्रकल्पासाठी योग्य, ज्ञानी आणि अनुभवी पीएमसीची निवड केली गेली पाहिजे. 
नियुक्त झालेल्या पीएमसीनी सोसायटीच्या जमिनीचे क्षेत्रफळ, इतर तांत्रिक बाबी विचारत घेऊन मुख्यत्वे सभासदांच्या गरजा व सूचना जाणून घेऊन त्यावर आधारित प्रकल्प व्यवहार्ता अहवाल (project Feasibility Report ) बनवला पाहिजे. 
या व्यवहार्य अहवालावर चर्चा व सुधारणा होऊन तो बहुमताने मंजूर झाल्यावर पीएमसीनी त्यावर आधारित निविदा/ टेंडर प्रक्रिया सुरु केली पाहिजे. या निविदा प्रक्रीयेत भाग घेतलेल्या विकासकांपैकी योग्य विकासक, पीएमसीनी तांत्रिक व गुणात्मक निकष लाऊन निवडून त्यापैकी सर्वोतम ५ किंवा ३ त्यापेक्षा कमी असतील तर तेवढ्यांची शिफारस सभासदांनी केली पाहिजे. 
अशा प्रकारे पूर्ण कायदेशीर मार्गाने सभासदांनी निवडलेल्या विकासकाबरोबर योग्य करार य इतर सोपस्कार पूर्ण करून पीएमसीनी  स्वतःच्या देखरेखीखाली उत्कृष्ट दर्जाचे टिकाऊ काम, वेळ नियोजनासह, ऑफरमध्ये नमूद केलेल्या सर्व आश्वासनांच्या पुर्ततेसह पूर्ण करून घेतले पाहिजे व सर्व सभासदांना घरांचा ताबा मिळवून दिला पाहिजे. ही आहे कलम ७९(अ) या शासकीय नियमावलीनुसार केली जाणारी पूर्ण कायदेशीर व सभासदांसाठी फायदेशीर अशी पुनर्विकास प्रक्रिया . 


For Free seminar & Society Meetings Contact :
Email :         ypmc.in@gmail.com 
call :            9223419450
Only Sms : 7303055782

No comments:

Post a Comment